वैष्णव माता राणी च्या दर्शनाचे फळ तेंव्हाच मिळेल ,जेंव्हा भैरवनाथांचं दर्शन घ्याल..
वैष्णव देवीं च मंदिर कटरा पासून १४ किमी च्या अंतरावर आहे . आणि वैष्णव मातेचं मंदिर जवळपास
५२०० फूट उंचीवर आहे . दर वर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.
अनेक तासांच्या चढाई नंतर भाविकांना मातेच्या दर्शनाचे सौभाग्य लाभते .
परंतु देवीच्या दरबारातून भाविक तोपर्यंत वापस येऊ शकत नाही जोपर्यंत ते भैरवनाथाचे दर्शन घेत
नाहीत .
असे म्हणतात कि जोपर्यंत भाविक वैष्णव मातेच्या दर्शनानंतर भैरवनाथांचं दर्शन करत नाहीत तोपर्यंत
दर्शन अपूर्ण मानले जाते . भैरवनाथांचं दर्शन घेतल्यावरच माता राणीची कृपादृष्टी होते .
देवीचं दर्शन घेतल्यावर भैरवनाथांचं दर्शन का घ्यावं लागत यासाठी एक पौराणिक कथा
प्रचलित आहे जी ऐकण्यासाठी आम्ही आणि तुम्ही नक्कीच उत्सुक आहोत .

पौराणिक मान्यतेनुसार ...
असे म्हणतात कि एकदा वैष्णव देवी चे परम भक्त श्रीधर यांनी नवरात्री पूजनासाठी कुमारिकांना
बोलावलं . मातेने कुमारिकेच रूप धारण करून तिथे पोहोचली . मातेने श्रीधराकडे गावातील सर्व
लोकांना भंडारा साठी आमंत्रण देण्याचं सांगितलं .
आमंत्रण मिळाल्यावर गावातील सर्व लोक श्रीधरा च्या घरी जेवणासाठी आले , तेंव्हा कुमारिके च्या
रूपातील मातेने सर्वाना आपल्या हाताने जेवण वाढायला सुरुवात केली ,जेवण वाढत असताना जेंव्हा
भैरवनाथाच्या जवळ गेल्या ,परंतु तेंव्हाच भैरवनाथ जेवणात मांस आणि मदिरा ची मागणी करू लागले.
कुमारिकेने खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु रागामध्ये भैरवनाथांनी कन्येला पकडण्याचा प्रयत्न केला
परंतु त्या आधीच हवेच्या रूपात माता त्रिकुट पर्वत कडे गेल्या .
याच पर्वतावरील एका गुफेत मातेने ९ महिन्या पर्यंत तपस्या केली . मान्यतेनुसार हनुमान हे मातेच्या
रक्षणासाठी त्यांच्या सोबतच होते .
भैरवनाथ सुद्धा त्यांचा पाठलाग करत करत त्या गुफे पर्यंत पोहोचले ,तेंव्हा माता गुफे च्या दुसऱ्या कडेने
बाहेर निघाल्या . हि गुफा आज पण अर्ध कुमारी किंवा आदिकुमारी नावाने प्रसिद्ध आहे .
गुफेच्या दुसऱ्या बाजूने बाहेर निघाल्यावर देखील भैरवनाथांनी त्यांचा मार्ग नाही सोडला तेंव्हा माता राणी
ने महाकाली चे रूप धारण करून भैरवनाथांचा संहार केला .
भैरवनाथांचं शीर उडवल्यावर भवनापासून ८ किमी अंतरावरील भैरव घाटी मध्ये जाऊन पडले ,त्या
स्थानाला भैरवनाथाच्या मंदिराच्या नावाने ओळखले जाते .
वध झाल्यावर भैरवनाथाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने क्षमे ची भीक मागितली .
दयाळू मातेने त्यांना केवळ माफ च नाही केलतर त्यांना वरदान देत सांगितलं कि माझं दर्शन तोपर्यंत
पूर्ण होणार नाही ,जोपर्यंत भाविक माझ्या दर्शनानंतर तुमचं दर्शन घेणार नाही .
ह्या पौराणिक कथेच्या मान्यते नुसार आज पण भाविक माताराणीचे दर्शन घेतल्यावर ८ किमी ची चढाई
करून भैरवनाथाचे दर्शन करतात जेणेकरून त्यांचे दर्शन पूर्ण व्हावे आणि माताराणीच्या दर्शनाचे फळ
मिळावे
0 Comments