तुम्हाला अडचणीत आणू शकतो तुमचा सोशल मीडिया स्टेटस कारण चोर हायटेक झालाय

तुम्हाला अडचणीत आणू शकतो तुमचा सोशल मीडिया स्टेटस कारण चोर हायटेक झालाय .. Newyoungistan.comएकीकडे सोशल मीडिया च भूत तर दुसरीकडे हायटेक चोर ... 

सैराट मधील "याड लागलं रं याड लागलं " गाण्याची आठवण नकीच येते 


कारण सोशल मीडिया च वेड असं काही लागलं आहे सर्वच याड लागल्यागत करत आहेत . स्मार्ट फोने 

च्या येण्याने  फेसबुक , ट्विटर आणि व्हाट्सएप्प सारख्या सोशल मीडिया वर सक्रिय झाले आहेत . 

प्रत्येकाला स्वतःचा फोटो आणि स्टेटस टाकण्याची हौस आहे . 


परंतु तुम्हाला हे माहित आहे का .. 

तुमचं स्टेटस तुम्हाला अडचणीत आणू शकते 


आजकाल बंद दारच कुलूप तोडून देखील चोरी करणारे चोर देखील हायटेक झालेत . आधी त्यांना चोरी 

करण्यासाठी दिवस रात्र गल्लोगल्ली फिरत असत . परंतु  आता चोरी करण्याचं काम सोपं झालं आहे . 

माहितीनुसार चोर आता कुठल्या तरी सायबर कॅफे मधून हे पत्ता  लावतात कि कोणतं घर रिकामं आहे 

आणि कुठल्या घरात अगदी सोप्प्या पद्धतीने चोरी केली जाऊ शकते . 

आपल्यावर सोशल मीडिया च इतकं काही वेड आहे कि आपण सगळ्या गोष्टी स्टेटस वर लहून टाकतो 

जसे कि "ऑन हॉलिडे" "आऊट ऑफ सिटी" 'आऊट ऑफ पुणे "

आणि पुरावा म्हणून आपला फोटो हा असतोच . 

आणि चतुर चोर याच गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतात , जे कि आजकाल हायटेक झालेत . 

उन्हाळयाच्या सुट्ट्या असल्या कि सगळेच आपापल्या गावी जातात . 


परंतु आमची आपल्याला विनंती आहे कि जाणून बुजून आपली व्यक्तिगत माहिती सोशल मीडिया वर 

जाहीर नका करू जेणेकरून हे हायटेक चोर तुमचं निमंत्रण समजून लुटून जातील आणि तुमच्या जवळ 

पच्छाताप करण्याशिवाय काही असणार नाही . 

एवढंच नाहीतर हा संदेश तुमच्या गल्ली ,सोसायटी मध्ये शेयर करा जेणेकरून आपल्या परिवारासोबतच 

आपला समाज देखील सुरक्षित राहावा . 


Post a Comment

0 Comments