पेट्रिसिया नारायण ,५० पैसे रोज ते २ लाख रोज पर्यंतचा प्रवास

जिथे  संघर्ष असतो तिथं यश नक्की असत

जे आपल्या आयुश्यात संकटापासून पळत नाहीत ,त्यांच्यावर नशीब  नक्कीच मेहरबान होते  . 

वरील वाक्यांना सत्यात उतरवलं आहे चेन्नई येथील पेट्रिसिया नारायण यांनी 


newyoungistan.comकधी काळी मरिना बीच वर कॉफी आणि कटलेट विकणाऱ्या पेट्रिशिया नारायण ने ५० पैसे कमावून २लाख रोज

 कमावण्यापर्यंत चा प्रवास कसा केला जे कि आज लोकांसाठी एक प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट  झाली आहे . 

लव्ह मेरेज ने उध्वस्त करून टाकलं आयुष्य 


पेट्रिसिया नारायण यांचा जन्म एका इसाई कुटुंबात झाला 

कुटुंबाच्या विरोधात  जाऊन त्यांनी प्रेमविवाह केला . लग्ना नंतर पतीने केवळ नोकरीच सोडली नाहीतर दारू ला 

आपला साथी बनवलं 

पेट्रिसिया स्वतःवर होणाऱ्या सर्व अत्याचाराला सहन करत राहिल्या आणि त्यातच त्यांनी २ मुलांना जन्म दिला . 

अत्याचार ज्या वेळी सहनशक्ती पेक्षा जास्त झाला त्यावेळी त्यांनी मुलांच्या भविष्या साठी पतीपासून वेगळं 

होण्याचा निर्णय घेतला . 


पहिल्या दिवशी कमावले होते ५० पैसे 


पती पासून वेगळं झाल्यावर स्वतःच आणि मुलांचं पोट भरण्यासाठी पेट्रिसिया नि स्वतःच्या पाक कलेला आपल

शस्त्र बनवलं . पेट्रिसिया यांनी एक गाडा लावून मरिना बीच वर कॉफी आणि कटलेट विकण्याचं काम सुरु केलं,

परंतु   पहिल्याच दिवशी एकच कॉफी विकल्या गेली आणि ५० पैशाची कमाई झाली . 


तेंव्हा पेट्रिसिया हताश झाल्या परंतु त्यांच्या आईने मनॊबल वाढवत आणखी जास्त मेहनत करण्यासाठी प्रेरित 

केलं. 

पेट्रिसिया यांची मेहनत रंग दाखवू लागली आणि त्यांनी १९८२ ते २००३च्या दरम्यान त्यांची दिवसाची कमाई ५० 

पैसे ते २५  हजार इतकी झाली . newyoungistan.comट्रैनिंग स्कूल मध्ये कँटीन ची सुरुवात 


मरिना बीच नंतर स्लम क्लीयरन्स बोर्ड आणि नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनींग स्कूल मध्ये कॅन्टीन लावून त्यांनी आपली 

आठवड्याची कमाई १ लाख पर्यंत नेली 


एका घटनेने पूर्णपणे तोडून टाकलं 

जेंव्हा पेट्रिसिया यांचा व्यवसाय चांगला चालत होता तेंव्हा त्यांनी २००३ साली मुलीचा विवाह केला आणि मुलगा 

प्रवीण मर्चंट नेव्ही मध्ये नौकरी करत होता . 

मुलीच्या लग्नानंतर पेट्रिसिया आपलं पहिलं रेस्टारंट चालू करणार होत्या तेंव्हाच त्यांच्या मुलीचा आणि जेवायचा 

कार अपघातात . या दुर्घटनेने त्या पूर्णपणे तुटल्या आणि आपल्या सर्व व्यवसायापासून दूर होत गेल्या . 


 संदीपा रेस्टोरेंट ची सुरुवात 


ह्या घटने नंतर पेट्रिसिया यांचा मुलगा प्रवीण यांनी जबाबदारी उचलत आणि आपल्या बहिणीच्या आठवणीत 

संदीपा रेस्टारेंट ची सुरुवात केली"संदीपा" चे  १४ आउटलेट 

दोन कर्मचाऱ्यापासून सुरुवात करणाऱ्या पेट्रिसिया नारायण यांच्या कडे २०० कर्मचारी आहेत आणि स्वतःच्या 

रेसटॉरेन्ट च्या अनेक शाखा आहेत . संदीपा रेस्टोरेंट चे चेन्नई मध्ये आज १४ शाखा आहेत ज्यामधून त्यांची 

दररोज ची कमाई हि २ लाखांपर्यंत आहे . 
२०१० मध्ये पुरस्कार 


हे पेट्रिसिया नारायण यांच्या मेहनतीचं फळ आहे कि त्यांना २०१० मध्ये "फिक्की इंटरप्रेटर ऑफ द इयर "

चा पुरस्कार मिळाला . 

काही लोक असे असतात , जे काही मिळवण्यासाठी स्वप्न तर पाहतात परंतु संघर्ष करण्यास तयार नसतात 

अश्याच लोकांसाठी पेट्रिसिया नारायण एक प्रेरणा आहेत , ज्यांनी हे दाखवून दिल कि जर, तुम्ही तुम्ही संघर्ष 

करण्यासाठी तयार आहात तर एक ना एक दिवस नशीब हे तुमच्या समोर झुकण्यासाठी मजबूर होत . 

Post a Comment

0 Comments